वृत्त क्रमांक
वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 23 जून :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी योजना राबविल्या जात आहेत. जिल्हयातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या www.vnvjntdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड दूरध्वनी क्र. 02462-220244 येथे संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक पी. एम. झोंबाडे यांनी केले आहे.
सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना योजना, बीज भांडवल कर्ज योजना, रु.1 लाख थेट कर्ज योजना या योजनांचे उद्दिष्ट या महामंडळाचे मुख्यालय मुंबईकडुन प्राप्त झाले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), लोहार समाजासाठी ब्रम्हलीन आचार्य पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), विणकर समाजासाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), नाथपंथीय समाजासाठी श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) या सहा महामंडळाची स्थापना केलेली असुन ही सर्व महामंडळे या महामंडळाअंतर्गत कार्यरत असुन या महामंडळाच्या मुख्यालय मुंबईकडुन उद्दीष्ट प्राप्त झालेले असुन त्यांना स्वतंत्र उद्दीष्ट देण्यात आले आहे. या सर्व महामंडळाअंतर्गत पुढीलप्रमाणे योजना राबविल्या जात आहेत.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
या योजनेची मर्यादा रुपये 15 लाख पर्यत असुन अर्जदार हा विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, संबंधीत व्यवसायाचे कोटेशन इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जदारांना सदरील योजनेसाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वरील सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन अर्ज भरता येईल.
गट कर्ज व्याज परतावा योजना
या योजनेची मर्यादा रुपये 10 लाख ते 50 लाख पर्यत असुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावे, गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 वर्ष पर्यंत असावे, गटातील लाभार्थ्याचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमीनल करिता 8 लाखाच्या मर्यादीत असावी. याकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, वयाचा पुरावा, संबंधीत व्यवसायाचे कोटेशन इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जदारांना सदरील योजनेसाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वरील सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन अर्ज भरता येईल.
एक लाख रुपये थेट कर्ज
योजना
या योजनेमध्ये महामंडळाकडुन 1 लाख रुपये
थेट कर्ज दिले जाते. या योजनेसाठी दोन जामीनदार तसेच बोझा नोंद करुन
देणे आवश्यक असुन या योजनेकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा
दाखला ( रु. 1 लाखापर्यंत), रेशनकार्ड,
आधार कार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचा परवाना इ. कागदपत्रांसह संबंधीत व्यवसायानुसार कागदपत्रे
आवश्यक आहे. अर्जदारांना सदरील योजनेसाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वरील
सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन अर्ज भरता येईल.
25 टक्के बीज भांडवल योजना
ही योजना बँकेमार्फत राबविली जात असुन बँकेचा
सहभाग 75 टक्के व महामंडळाचा सहभाग 25 टक्के असतो. अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा
दाखला (रु.1 लाखापर्यत),रेशनकार्ड,
आधार कार्ड, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, संबंधीत व्यवसायानुसार आवश्यक
कागदपत्रे आवश्यक आहे. अर्जदारांना सदरील योजनेसाठी महामंडळाच्या अधिकृत
संकेतस्थळावर वरील सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन अर्ज भरता येईल, असेही
प्रसिद्धी पत्रकाद्वारे महामंडळाने आवाहन केले आहे.
000000
No comments:
Post a Comment