वृत्त क्रमांक
लिंबगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद
नांदेड, दि. ४ जून : ‘एक दिवस मुक्काम खेड्यामध्ये’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल रात्री ३ जून रोजी नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथे भेट देऊन मुक्काम केला. यावेळी त्यांनी गावातील विविध कामांची पाहणी करत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.
जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी परिसरातील वृक्षारोपण, घरकुल लाभार्थी, संजय गांधी व इंदिरा गांधी निराधार योजनेचे लाभार्थी तसेच अंत्योदय योजनेतील कुटुंबांना प्रत्यक्ष भेट दिली. गावातील विविध समस्या आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यामध्ये स्थानिक प्रश्नांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री.देशमुख, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार व सुनील माचेवाड, पोलीस उपनिरीक्षक सय्यद, मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंधळे, तलाठी अंजुषा जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन संशोधन, पीककर्ज आणि पीकविमा योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे ग्रामस्थांना आपले प्रश्न थेट मांडण्याची संधी मिळाली. त्यांच्या भेटीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.
०००००
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment