Thursday, April 30, 2026

वृत्त क्रमांक

जिल्हा युवा पुरस्कार जाहीर  

नांदेड दि. 30 एप्रिल :- राज्याचे युवा धोरण सन 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासननिर्णय 12 नोव्हेंबर, 2013 अन्वये जिल्हयात कार्यरत असलेल्या  युवक, युवतीं व नोंदणीकृत संस्थानी केलेल्या समाजहिताच्या उल्लेखीत कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे. 

यासाठी जिल्हयातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थाकडून जिल्हा युवा पुरस्कार सन 2024-25 या वर्षाच्या युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुषंगाने प्राप्त प्रस्तावाची जिल्हास्तर युवा निवड समितीच्या वतीने छाणणी करुन अंतिम पुरस्कारार्थीची नांवे पुढीलप्रमाणे आहेत. 

सन 2025-26 (युवक) करीता लवकुश मधुकर जाधव (युवक) व साधना कैलाश गायकवाड  (युवती) यांची जिल्हास्तर युवा पुरस्कार निवड समितीमार्फत निवड करण्यांत आली असून या पुरस्काराचे स्वरुप 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असुन सदरचा पुरस्कार महाराष्ट्र दिन 01 मे, 2026 चा  मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम मध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे.

त्याकरीता जिल्हयातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, राज्य क्रीडा पुरस्कारार्थी, विविध एकविध खेळ संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी यांनी दिनांक  01 मे, 2026 रोजी वेळ सकाळी 8.30 वा. पोलीस परेड मैदान, वजिराबाद, नांदेड येथे मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते  श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय मशीन चे लोकार्पण   ...