Thursday, April 30, 2026

वृत्त क्रमांक 

महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबत समाज कल्याणच्या सूचना 

शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी व्हर्जन 2.00 कार्यान्वित

 

नांदेड दि. 30 एप्रिल : राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार महाडीबीटी प्रणालीचे व्हर्जन २.०० हे आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. नवीन प्रणालीमध्ये डेटा हस्तांतरण आणि तांत्रिक सुसूत्रता राखण्यासाठीजुन्या प्रणालीवरील प्रलंबित अर्ज निकाली काढणे अनिवार्य आहे.

 

सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टल वरील सर्व योजनांचे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील भरपूर प्रमाणात अर्ज महाविद्यालय व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येते. सर्व महाविद्यालयांनी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत, अशा विद्यार्थ्यांना संपर्क करून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी. सदरील पात्र अर्ज तात्काळ या कार्यालयाचे स्तरावर पाठविण्यात यावेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पूर्तता होत नसतील व जे अर्ज अपात्र आहेत असे अर्ज आपल्या स्तरावरून रिजेक्ट करण्यात यावेत.

 

नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरील सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षातील प्रलंबित अर्ज मंगळवार ५ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत निकाली काढावेत तसेच सन २०२५-२६ या वर्षातील प्रलंबित अर्ज रविवार १० मे २०२६ पर्यंत निकाली काढावेत. सदरील मुदत ही अंतिम असून यानंतर सदरील अर्जावर कार्यवाही होणार नाही, याची नोंद घायवी. तारखेनंतर एकही अर्ज प्रलंबित राहिल्यास व एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहील, असे आवाहन आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.  

000000  

No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना #शे...