Saturday, April 25, 2026

जागतिक हिवताप दिन नांदेड येथे साजरा 

नांदेड :- आज दि.२५ एप्रिल " जागतिक हिवताप दिन " निमित्त नांदेड येथे जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ श्री अमृत चव्हाण,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत रिठे,शहर क्षयरोग अधिकारी डॉ बद्दीओदीन सर यांच्या हस्ते " जागतिक हिवताप दिन " महात्मा गांधी पुतळा पासुन ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी सहाय्यक अधिक्षक विजय चव्हाण,आरोग्य पर्यवेक्षक संजय भोसले,गंगाधर गनलेवार, आरोग्य निरीक्षक माधव कोल्हे,सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, बालाजी निलपत्रेवार,अरुण आळणे, सुरेश आरगूलवार, मनोहर खानसोळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विलास नाईक, सचिव दळवी,राजु शेट्टे, वैभव कौशल्ये,आरोग्य कर्मचारी पुष्पराज राठोड, गणेश भुसा, प्रभाकर मुंगल, व्यंकटी बकाल,भारत हांम्पले, उत्तम कराड, व्यंकट मोरे, अनिल सुर्यवंशी,यासीन शेख,चंद्रभान धोंडगे,सुनिल बगाटे, विष्णूदास गलपवाड, संजय कळसे,रणखांब,पवार, देविदास पेंढारकर,भिमराव राठोड, शेख खलील, कैलास कुंटुरवार,परमेश्वर स्वामी मठदेवरु, लिपिक पांडुरंग बोरकर, क्षेत्र कर्मचारी यांच्यासह असंख्य कर्मचारी रॅलीत सहभागी होते. व्यंकटेश पुलकंठवार यांनी डास निर्मुलन प्रतिज्ञा देऊन रॅलीचा समारोप केला.
00000

No comments:

Post a Comment

​ जागतिक हिवताप दिन नांदेड येथे साजरा  नांदेड :- आज दि.२५ एप्रिल " जागतिक हिवताप दिन " निमित्त नांदेड येथे जनजागरण रॅली काढण्यात आ...