वृत्त क्रमांक
नवीन सेवार्थ प्रणालीचे ई-बील प्रशिक्षण संपन्न
नांदेड दि. 6 मार्च :- जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नवीन सेवार्थ प्रणाली अंतर्गत ई-बील संदर्भात नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण यांचे प्रशिक्षण आज शुक्रवार 6 मार्च रोजी जिल्हा नियोजन सभागृह नांदेड येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणास जवळपास 153 आहरण व संवितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख यांनी नविन सेवार्थ प्रणालीबाबत मार्गदर्शन केले.
अप्पर कोषागार अधिकारी श्रीमती वैशाली ताटपल्लेवार यांनी नवीन सेवार्थ प्रणालीबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच कनिष्ठ लेखापाल मास्टर ट्रेनर शंकर दुमाने, लेखा लिपीक बसवेश्वर वाळके, सुनिल संगेवार यांनीही माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार लेखा लिपीक प्रमोद शिंदे यांनी केले.
सर्व तालुक्यातील
आहरण व संवितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 'नवीन सेवार्थ प्रणाली' ई- बिल संदर्भात
पुढील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वा.
करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास संबंधित लेखा विभागातील सर्व
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम
देशमुख यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment