वृत्त क्र. 167
जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनास प्रशिक्षणार्थ्यांचा उत्सफूर्त सहभाग
नांदेड, दि. 4 फेब्रुवारी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणाबरोबरच कौशल्यास वाव मिळावा, नवनवीन संकल्पना, नाविन्यता विकसीत व्हावी या उद्देशाने जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये संपूर्ण जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था मिळून जवळपास 24 संस्थानी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमासाठी संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य हर्षदभाई शहा, संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुर्यवंशी एस. व्ही., औ.प्र. संस्था अर्धापूरचे प्राचार्य तथा संस्थेचे उपप्राचार्य कंदलवाड व्ही. डी., प्राचार्य सर्वश्री त्रिचूरकर, फारूकी, गायकवाड, पिंडकुलवार, अन्नपुर्णे पी. के. तसेच जिल्हयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील संस्थेतील शिल्प निदेशक तथा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी तंत्रप्रदर्शनासारख्या संकल्पना राबवल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या कौशल्यास वाव मिळतो. सध्याचे युग हे उद्योगाला चालना देणारे तसेच नविन उद्योग धोरण राबवणारे असल्यामुळे नवनविन उद्योजक निर्माण होऊ शकतात. संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य हर्षदभाई शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तंत्रप्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व आधूनिक बदलांशी जुळवून घेणेसाठी त्यांना उदयुक्त करता येते, असे नमूद केले.
तंत्रप्रदर्शनामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील आवश्यक असणाऱ्या गोष्टींवर अतिशय नाविन्यपुर्ण संकल्पना आणि तांत्रीक कौशल्यावर आधारीत
असे उपकरणे तयार केली. प्रदर्शनाचा लाभ नांदेडमधील विविध शाळांनी घेतला.
कार्यक्रमाचे आभार करताना संस्थेचे उपप्राचार्य व्ही. डी. कंदलवाड यांनी
सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहीत करून त्यांचे कौतूक केले. कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन सचिन राका यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
0000
No comments:
Post a Comment