वृत्त क्र. 179
किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत १ मेपर्यंत हमीभावाने तूर खरेदी
नांदेड, दि. ६ फेब्रुवारी : हंगाम २०२५–२६ मध्ये तूर पिकाची हमीभावाने खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी महाराष्ट्र राज्यासाठी एकूण ३ लाख ३७ हजार मेट्रिक टन तूर खरेदीस मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. १ फेब्रुवारी २०२६ पासून पुढील ९० दिवसांसाठी, म्हणजेच १ मे २०२६ पर्यंत हमीभावाने तूर खरेदी सुरू ठेवण्याबाबत शासनाने कळविले आहे.
हमीभावाने तूर विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि., विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. तसेच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांच्या अधिकृत खरेदी केंद्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment