Saturday, February 14, 2026

वृत्त क्र. 209

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 16 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिन  

नांदेड, दि. 14 फेब्रुवारी :-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 16 फेब्रुवारी 2026 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, एसबीआय एटीएमच्या मागे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  वसरणी येथील महाराजस्व शिबिरात १४७४ प्रमाणपत्रांचे वाटप  महाराजस्व शिबिराच्या माध्यमातून प्रशासन सामान्य माणसापर्यंत पोहोचतेय ...