वृत्त क्रमांक
नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362
आपले सरकार सेवा केंद्र मंजूर
14 ते 23
फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
नांदेड दि. 12 फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यातील
ग्रामपंचायत क्षेत्रासाठी “आपले सरकार सेवा केंद्र (सेतू)” सुरू करण्याचा निर्णय जिल्हा सेतू समिती, नांदेड यांनी घेतला आहे.
जिल्ह्यातील एकूण 1 हजार 322 ग्रामपंचायतींमध्ये 1 हजार 362
आपले सरकार सेवा
केंद्रांना मंजुरी देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपले सरकार सेवा केंद्रासाठी
अर्ज प्रक्रिया 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11
वाजल्यापासून ते 23
फेब्रुवारी 2026
रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल
कर्डिले यांनी केले आहे.
तसेच इच्छुकांनी दिलेल्या लिंकवर जाऊन आवश्यक माहिती
अचूक भरून अर्ज सादर करावा. ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व
सेवा सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. “आपले सरकार सेवा केंद्र” मार्फत विविध दाखले, प्रमाणपत्रे, परवाने, शासकीय अर्ज, तसेच विविध ऑनलाईन सेवा गावपातळीवर
उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात वारंवार
जावे लागणार नाही. यामुळे वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होणार आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील युवक-युवती तसेच
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. रिक्त
गावांच्या एकूण जागांपैकी 5 टक्के जागा दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने देण्यात
येणार आहेत. सदर जाहिरात, रिक्त गावांची यादी तसेच अटी व शर्तींबाबत सविस्तर
माहिती नांदेड जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://nanded.gov.in
उपलब्ध आहे. तरी
नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
No comments:
Post a Comment