Monday, November 17, 2025

 वृत्त क्रमांक 1216

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड, दि. 17 नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा-2025 रविवार 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर दुपारी 2.30 ते 5 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 51  परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. 

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार  या परीक्षा केंद्रापासून शंभर मिटरच्या परिसरात रविवार 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यक्तीरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही.  

तसेच परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॅपटॉप इत्यादी तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या शंभर मिटरपर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास, त्याचप्रमाणे वर दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स,एस.टी.डी., आय.एस.डी.,भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...