Tuesday, November 4, 2025

वृत्त क्रमांक 1159

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड दि. 4 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नायगाव येथे ‘महाराजस्व अभियान’ उत्साहात; अभियानात दोन हजार...