Wednesday, August 13, 2025

 वृत्त क्रमांक 847 

इस्राईलमध्ये 5 हजार रोजगाराच्या संधी

 

नांदेड दि. 13 ऑगस्ट :- जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी परदेशात रोजगार मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या माध्यमातून इस्त्राईल देशात “होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स”च्या 5 हजार पदासाठी भरती होणार आहे. अर्जदाराने संकेतस्थळावर अर्ज करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.  

 

या भरतीसाठी महाराष्ट्र नर्सिग कौन्सिल मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर भेट देऊन सविस्तर कार्यविवरण, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज प्रक्रियेची माहिती पाहून अर्ज सादर करावा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यात जागरुकता मोहिम राबवून पात्र उमेदवारांना अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक सहाय्य केले जाणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी  किराणा साहित्य पुरवठादारांनी  15 ऑक्टोबरपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन नांदेड (जिमाका), दि...