वृत्त क्रमांक 434
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात "पोषण पंधरवाडा" साजरा
नांदेड दि. 25 एप्रिल :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. आय. एफ. इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत 8 ते 22 एप्रिल कालावधीत पोषण पंधरवाडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात प्रामुख्याने गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी व 6 वर्षांखालील मुलांसाठी ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, ग्रामीण रुग्णालय मुदखेड तसेच शहरी आरोग्य व प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर नांदेड येथे पदव्युत्तर विद्यार्थ्यांकडून पोषणाविषयी मार्गदर्शनसत्र आयोजित केले होते.
स्थानिक संसाधनांपासून पौष्टीक अन्न कसे बनवायचे व पुरक आहार कसा बनवायचा याचा सल्ला देवून जनसामान्यांचे मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी महिलांच्या पोषण विषयक शंकाचे निवारण करण्यात आले. किशोरवयीन मुलांसाठी समुदायिक व शालेयस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात "वैयक्तीक स्वच्छता, आरोग्य व पोषणाविषयी जनजाग्रती व शिक्षण" देण्यात आले. त्याचबरोबर 6 वर्षाखालील मुलांचे उंची, वजन, मिड अप्पर आर्म सरकंफरन्स मोजने व सूक्ष्म पोषक तत्वांच्या कमतरतेसाठी तपासणी करण्यात आली व आवश्यक औषधोपचार इत्यादी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन स्तरावर शहरातील विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी "पोषण जागरुकता सत्र व जंक फुडचा दुष्परिणाम" यावरील मार्गदर्शनाकरिता पदयुत्तर विद्यार्थी व वैद्यकीय शिक्षण घेणारे अंतरवासिता डॉक्टर यांच्याकडून नाटक, पथनाटय तसेच पोष्टर प्रदर्शन व गटचर्चा इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते.
पोषण पंधरवाडा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागातील विभागप्रमुख डॉ. ए. आय. इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. आर.डी.गाडेकर सहा. प्राध्यापक ज्योती भिसे, डॉ. फराह तसेच पदयुत्तर डॉक्टर यांनी विशेष प्रयत्न केले.
0000
No comments:
Post a Comment