नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील #नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली दिली. मंत्री महोदयांसोबत शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.पोलीस दलातर्फे त्यांना हवेत तीन फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली.
Tuesday, August 27, 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्र. 750 तहसील कार्यालयात लोकशाही दिन संपन्न एका प्रकरण निकाली नांदेड, दि. २१ जुलै :- आज तहसिल कार्यालय नांदेड येथे तहसीलदार संजय वा...

-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
-
वृत्त क्र. 1 47 नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्य...
No comments:
Post a Comment