वृत्त क्र. 780
पिंपळगाव नि. येथील वादग्रस्त मोकळी जागा
प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत
नांदेड दि.29 ऑगस्ट :- भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड तालुक्यातील मौ. पिंपळगाव नि. येथील सदर वादग्रस्त मोकळी जागा 28 ऑगस्ट रोजी 24 वाजेपासून ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे.
तसेच मौ. पिंपळगाव नि. येथील वादग्रस्त जागेवरुन गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशीत पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिले आहेत. संबंधीतास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणिबाणीचे प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये एकतर्फी आदेश 28 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.
00000
No comments:
Post a Comment