Tuesday, August 20, 2024

वृत्त क्र. 743

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड, 20 ऑगस्ट :- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा 2024 ही परीक्षा रविवार 25 ऑगस्ट 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील 33 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 12 आणि   दुपारी 3 ते सांयकाळी 5 या कालावधीत दोन सत्रात होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळवले आहे. 

या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये रविवार 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रान्झिस्टर, रेडीओ, लॅपटॉप, तत्सम वस्तू वापरण्यास व बाळगण्यास, तसेच सर्व सार्वजनिक टेलिफोन एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी  किराणा साहित्य पुरवठादारांनी  15 ऑक्टोबरपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन नांदेड (जिमाका), दि...