Thursday, June 20, 2024

 वृत्त क्र. 509

श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

नागरिकांना लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन  

 

नांदेड दि. 20 :- ‍जिल्हा प्रशासनाच्यावतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार 21 जून, 2024 रोजी सकाळी 6.30 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन एनआरआयच्या बाजुस हिंगोली गेट नांदेड येथे साजरा करण्यात येणार आहे.  नांदेड जिल्हयातील विविध योग समिती, योग प्रशिक्षक, आयुष मंत्रालयाचे प्रतिनिधी, यांच्यावतीने सदरील कार्यक्रमास मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्हयातील नागरीकांनी 21 जुन रोजी सकाळी 6.15 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन, एनआरआयच्या बाजुस हिंगोली गेट नांदेड येथे उपस्थित राहुन आंतरराष्ट्रीय योग दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व विभागाप्रमुखांनी त्यांच्या स्तरावरुन त्यांच्या अधिनस्त कार्यालयाना आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत सूचना निर्गमित करण्याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत.

००००० 

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...