Thursday, February 8, 2024

  

निरुपयोगी, वापरात नसलेल्या व कालबाहय वस्तूंच्या

खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 

लातूर(विमाकादि.08:- विभागीय माहिती कार्यालयाच्या जडसंग्रह विभागातील काही वस्तू निरुपयोगी, वापरात नसलेल्या व कालबाह्यतुटलेल्या अशा आहेत. या वस्तूंची विक्री करावयाची आहे, त्यासाठी इच्छुक खरेदीदारांनी  खरेदीबाबतची दरपत्रके विभागीय माहिती कार्यालयमध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उत्तरबाजू तळमजला, लातूर येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेत दिनांक  20/02/2024 पर्यंत सादर करावीतमुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

        कार्यालयीन  कामकाजाच्या वेळेत या वस्तू पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कार्यालयात येऊन या वस्तुंची पहाणी करावी तसेच अटी व शर्तीची माहिती करून घ्यावी, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

***** 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 230 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत अवसायकांची नामतालिका (पॅनल) साठी मागविण्यात आले अर्ज   नांदेड दि. 25 फेब्रुवारी ...