Thursday, July 6, 2023

 अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक

कायदाबाबत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारीत अधिनियम 2016 ची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायद्याचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी नांदेड जिल्हास्तरीय  एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 7 जुलै 2023 रोजी  सकाळी 10 ते सायं. 6 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजिक न्याय भवन नांदेड येथील सांस्कृतिक सभागृहात एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

सदर कार्यशाळेत  नांदेड जिल्हयातील उपविभागीय अधिकारी (सर्व), उपविभागीय पोलिस अधिकारी (सर्व), तहसिलदार (सर्व), व सर्व गट विकास अधिकारी  आणि जिल्हा व उपविभागीय दक्षता नियंत्रण समितीचे सर्व सदस्य सहभागी होणार आहेत.  या कार्याशाळेस बार्टीचे महासंचालक, जिल्हा सरकारी वकील हे मार्गदर्शन करणार आहेत.सर्व संबंधित सदस्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन बार्टी महासंचालक व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...