Friday, October 14, 2022

 नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीस नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. सन 2022 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छूक व पात्र अर्जदारांनी www.awards.gov.in या संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचनानुसार 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करा! • चारा, पाणी, पशुवैद्यकीय उपचार व शासकीय मदत योग्...