नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही
नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 108 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 802 एवढी झाली असून यातील 1 लाख 108 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आज उपचार घेत असलेल्या बाधितामध्ये नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 583
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 80 हजार 566
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 802
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 108
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-02
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक
000000
No comments:
Post a Comment