Monday, November 29, 2021

 जागतिक मृदा दिन 5 डिसेंबरला साजरा करावा

नांदेड (जिमाका) दि. 29 :- सधन कृषि पद्धतीत रासायनिक खतांचा त्याबरोबर पाण्याच्या अति वापरामूळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. याचाच विपरीत परिणाम पीक उत्पादनावर होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना पीक उत्पादन व मृदाबाबत माहिती होण्यासाठी मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण 5 डिसेंबर मृदा दिनाच्या निमित्ताने करण्याचे नियोजन आहे. 

कोविड-19 चा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सुरक्षिततेचा उपाययोजना म्हणून शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. पुणे कृषि आयुक्तालयाने दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यात 5 डिसेंबर रोजी “जागतिक मृदा” दिवस साजरा करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील संबंधित विभागाना दिले आहेत.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...