Tuesday, April 27, 2021

1 हजार 364 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 1 हजार 4 व्यक्ती कोरोना बाधित 29 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

                                                     1 हजार 364 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात हजार 4 व्यक्ती कोरोना बाधित

 29 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 416 अहवालापैकी 1 हजार 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 753 तर अँटिजेन तपासणीद्वारे 251 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 77  हजार 932 एवढी झाली असून यातील 63  हजार  782  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  12  हजार  405  रुग्ण उपचार घेत असून 249 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 25 ते 27 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 29 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 483 एवढी झाली आहे. दिनांक 25 एप्रिल रोजी मुखेड कोविड रुग्णालय मुखेड तालुक्यातील सकनुर येथील 50 वर्षाचा पुरुष, व्हिजन रुग्णालय येथील एस.व्ही.एम कॉलोनी किनवट येथील 45 वर्षाचा पुरुष, मुदखेड तालुक्यातील डोणगाव येथील 60 वर्षाचा पुरुष, झेंडा चौक नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, अपेक्षा रुग्णालय येथील आर्शीवाद नगर नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष दिनांक 26 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील भोकर तालुक्यातील धामदरी येथील 50 वर्षाचा पुरुष, मुदखेड तालुक्यातील  धनज येथील 65 वर्षाचा पुरुष, मुदखेड येथील 47 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 82 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे कंधार तालुक्यातील शिराढोण येथील 85 वर्षाची महिला, पाक्जा नगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला,हदगाव तालुक्यातील ठाकूरवाडी येथील 55 वर्षाचा पुरुष, धर्माबाद येथील 55 वर्षाची महिला, सापंच नगर नांदेड येथील 59 वर्षाची महिला, भोकर येथील 65 वर्षाची महिला, नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथील 65 वर्षाची महिला, लोहा कोविड रुग्णालय येथे टेळकी तालुका लोहा  येथील 60 वर्षाची महिला, देगलूर कोविड रुग्णालय येथे शहापूर तालुका देगलूर येथील 71 वर्षाची महिला, गोदावरी कोविड रुगणालय येथे नाईक नगर नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, फिनिक्स कोविड रुग्णालय येथे आशीर्वाद नगर नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, डेल्टा रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील रुई येथील 45 वर्षाचा पुरुष दिनांक 27 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे गोपालचावडी तालुका नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 66 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील 71 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुगणालय येथे हदगाव येथील 60 वर्षाचा पुरुष, साईकृपा रुग्णालय येथे भोकर तालुक्यातील सावरगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, तिरुमला रुग्णालय येथे तरोडा नाका नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, निर्माया रुग्णालय येथे गणेशनगर नांदेड येथील 72 वर्षाची महिला, श्री गणेश रुग्णालय येथे देगलूर येथील 59 वर्षाची महिला   यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.84 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 153, बिलोली 12, हिमायतनगर 16, माहूर 8, नांदेड ग्रामीण 21, देगलूर 33, कंधार 47, मुदखेड 38, अर्धापूर 35, धर्माबाद 22, किनवट 70, मुखेड 70, भोकर 3, हदगाव 99, लोहा 21, नायगाव 66, उमरी 6, परभणी 5, हिंगोली 15, पुणे 1, यवतमाळ 6, निर्मल 3, लातूर 3  असे एकूण 753 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 24, बिलोली 1, उमरी 1, माहूर 9, उसमानाबाद 1, नांदेड ग्रामीण 4, देगलूर 4, कंधार 16, मुदखेड 41, हिंगोली 4, अर्धापूर 4, धर्माबाद 67, किनवट 38, मुखेड 12, परभणी 3, भोकर 6, हदगाव 4, लोहा 8, नायगाव 3, नाशिक 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 251 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 364 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 12, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 930, धमार्बाद तालुक्यातंर्गत 23, देगलूर कोविड रुग्णालय 1, अर्धापूर तालुक्यातंर्गत 4, उमरी तालुक्यातंर्गत 32, मालेगाव टीसूयु कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 26, मुखेड कोविड रुग्णालय 56, बिलोली तालुक्यातंर्गत 22, किनवट कोविड रुग्णालय 30, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 15, नायगाव तालुक्यातर्गत 6, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 7, हदगाव कोविड रुग्णालय 34, कंधार तालुक्यातंर्गत 15, माहूर तालुक्यातंर्गत 15, लोहा तालुक्यातंर्गत 21, खाजगी रुग्णालय 123 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 12 हजार 405 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 215जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 84जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 177शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 98, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 83, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 120, देगलूर कोविड रुग्णालय 51, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 56, बिलोली कोविड केअर सेंटर 78, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 12, नायगाव कोविड केअर सेंटर 31उमरी कोविड केअर सेंटर 56माहूर कोविड केअर सेंटर 35भोकर कोविड केअर सेंटर 9हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 53, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 88, कंधार कोविड केअर सेंटर 17, धर्माबाद कोविड केअर सेंटर 81 , मुदखेड कोविड केअर सेंटर 19, अर्धापूर कोविड केअर सेंटर 18, बारड कोविड केअर सेंटर 15, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 11, मांडवी कोविड केअर सेंटर 17, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 29एनआरआय कोविड केअर सेंटर 90पंजाब भवन कोविड केअर सेंटर 46 ,  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 5 हजार 324, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 3 हजार 225 , खाजगी रुग्णालय 2 हजार 266, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 12 हजार 405 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 25 खाटा उपलब्ध आहेत.

 

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 51 हजार 221

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 64 हजार 221

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 77 हजार 932

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 63 हजार 782

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 483

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.84 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-35

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-27

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-391

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 12 हजार 405

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-249

00000

No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...