Sunday, November 8, 2020

 

48 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

35 कोरोना बाधितांची भर  तर चार जणांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  रविवार 8 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 48 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 35 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 26 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 9 बाधित आले. 

आजच्या एकुण 856 अहवालापैकी  802 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 443 एवढी झाली असून यातील  18  हजार 345 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 401 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 25 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज रोजी प्राप्त अहवालानुसार चार रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 529 झाली आहे. शनिवार 7 नोव्हेंबर 2020 रोजी खाजगी रुग्णालयात राज कॉर्नर नांदेड येथील 75 वर्षाचा एक पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय येथे मुखेड तालुक्यातील बोरगाव येथील 70 वर्षाचा एक पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे लोहा तालुक्यातील डेरला येथील 55 वर्षाचा एक पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे भोकर येथील 45 वर्षाचा एका पुरुषाचा  उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, मांडवी अंतर्गत कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 10, बिलोली कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14, अर्धापूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6 असे एकूण 48 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.21 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 22, अर्धापूर तालुक्यात 1, उमरी 1, लोहा 1, कंधार 1  असे एकुण 26 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 3, किनवट तालुक्यात 1, हदगाव 2, नांदेड ग्रामीण 1, भोकर 1, मुखेड 1 असे एकूण 9  बाधित आढळले. 

जिल्ह्यात 401 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 42, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 35, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 37, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 147, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 21, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 10, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 6, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 17, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 50 आहेत.  

रविवार 8 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 160, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 75 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 21 हजार 297

निगेटिव्ह स्वॅब- 98 हजार 358

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 443

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 345

एकूण मृत्यू संख्या- 529

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.21 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-15

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 443

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 401

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 25. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...