Friday, July 17, 2020


वृत्त क्र. 660   
बँक व्यवहाराबाबत संचारबंदीचे सुधारित आदेश  
नांदेड (जिमाका) दि. 17 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात या विषाणुची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संचारबंदीबाबत आज सुधारित आदेश निर्गमीत केले आहेत. या सुधारित आदेशानुसार अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असलेली बँकेची ठोक व्यवहार (Bulk transation for essential servies) चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
यापुर्वीच्या आदेशात नांदेड जिल्ह्यातील सर्व बँकेचे कर्मचारी हे त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करु शकतील त्याव्यतिरिक्त बॅकेत शासकिय कार्यालयाचे बँकेशी निगडीत शासकिय व्यवहार चालू राहतील परंतू इतर कोणतेही ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध राहिल असे निर्देश दिले होते.  
0000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी सक्ती खपवून घेतली जाणार नाही - जिल्हाधिकारी   आरबीआयच्या मार्गदर्शक सू...