Thursday, July 9, 2020

वृत्त क्र. 627


 आस्थापनांना कर्मचाऱ्यांची माहिती
ऑनलाईन भरण्याचे आवाहन
नांदेड, दि. 9 (जिमाका) :- शासकिय-निमशासकिय कार्यालय तसेच खाजगी आस्थापनांनी जुलै 2020 या महिन्याचे वेतन देयक दाखल करताना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती असलेले जून-2020 अखेरचे ई. आर-1 त्रैमासिक विवरणपत्र 31 जुलै 2020 पर्यंत भरावयाची मुदत आहे. कार्यालयाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळवरुन ऑनलाईन ई-आर 1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडल्याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके कोषागारात स्विकारले जाणार नाहीत याची संबंधीतानी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक प्रशांत खंदारे यांनी केले आहे.
सर्व कार्यालयांना युजर आय.डी. व पासवर्ड यापुर्वीच देण्यात आलेला आहे. सर्व कार्यालयानी आपला ईमेल आय.डी. व फोन नंबर, पत्ता, टॅन नंबर,पॅन नंबर टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...