Wednesday, December 11, 2019


श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त
24 डिसेंबरला स्थानिक सुट्टी
नांदेड, दि. 11 :- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सन 2019 साठी नांदेड जिल्ह्यात स्थानिक सुट्टया निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंगळवार 24 डिसेंबर 2019 रोजी श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा (पालखी सोहळा ) यानिमित्त नांदेड जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा ( पालखी सोहळा ) निमित्त मंगळवार 24 डिसेंबर 2019 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार, उपकोषागार कार्यालये व शैक्षणिक संस्थांना या सुट्टया लागू राहतील. सुट्टयांचा हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...