Thursday, November 29, 2018


कापूस, तूर पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 29 :-  जिल्हयात कापूस, तुर  पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतक-यांसाठी पिकासाठी किडीपासून संरक्षणासाठी कृषी संदेश देण्यात आला आहे.
कापुस- फरदड  कापुस घेण्याचे टाळावे आणि थायमिथोक्झॅम 12.6 + लॅमडा सॅहलोथ्रीन 9.5 झेड सी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.
तुर शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत. तसेच इमामेक्टीन बेंझोएट 5 एस जी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर  पाण्यात मिसळुन फवारावे. गुंडाळलेली पाने अळीसहीत नष्ट़ करावीत. पक्षी थांबे लावावेत. हरभरा पिकावर घाटेअळीसाठी पक्षी थांबे तसेच कामगंध सापळे लावावेत आणि निरीक्षण करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील १८ हजार १२४ मतांनी विजयी डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ८५ हजार ८७६, तर सतीश चव्...