केळी पिकाचा कृषि संदेश
नांदेड दि. 28 :- मुदखेड
व अर्धापूर तालुक्यातील केळी पिक संरक्षणासाठी कृषि संदेश पुढील प्रमाणे देण्यात
आला आहे. केळी पिकांवर कार्बेन्डॅझिमची दुसरी फवारणी केल्यानंतर पानावरील पिवळ्या
ठिपक्यांचा रंग तपकिरी होतो. नंतर प्रोपीकोनेझॉल या किटकनाशकाची 0.1 टक्के 1 ग्रॅम
प्रती लिटर पाण्यात 1 मिली स्टीकर टाकून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि
अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment