Monday, August 25, 2025

 वृत्त क्रमांक 900

२५,२६ व २८ ऑगस्ट या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट

हवामान विभागाचा इशारा 

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २५,२६ व २८ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.  २५,२६ व २८ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी असे आवाहान जिल्हा प्रशासनाने केले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

या गोष्टी करा :

१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

४) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

१) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

२) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

३) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

४) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

०००००

वृत्त क्रमांक 899

गवंडी व बेलदार शिष्टमंडळाच्या मागण्याबाबत पडताळणी करुन अहवाल सादर करा

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिल्या सूचना

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न

नांदेड दि. 25 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यात गवंडी व बेलदार या जातीच्या समकक्षतेबाबत त्या समाजाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या मांडल्या. सदर मागण्याबाबत पडताळणी करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारोती शिकारे यांनी दिल्या. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारोती शिकारे यांनी नांदेड जिल्ह्यातील गवंडी, बेलदार या जाती संदर्भात  बैठक सुनावणी व कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, भोकर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, हदगाव उपविभागीय अधिकारी अविनाश काबंळे, कंधार उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, बिलोली उपविभागीय अधिकारी के.के. डोंम्बे, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, अध्यक्ष शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, संबंधित विभागाचे अधिकारी, बेलदार समाजाचे शिष्टमंडळाचे अध्यक्ष व सदस्यांची उपस्थिती होती. 

गवंडी व बेलदार हे दोन्ही समाज समकक्ष आहेत का ? या सर्व बाबींची पडताळणी करुन उपविभागीय अधिकारी यांनी तसा अहवाल मागासवर्ग आयोगास सादर करावा, असे निर्देश आयोगाचे सदस्यांनी दिले. यावेळी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी ओबीसी, एसबीसी, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसीबीसी, ईडब्लुएस, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितणाबाबत आढावा घेतला. सध्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रीया सुरू असून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र पडताळणीमुळे त्यांना अडचण निर्माण होऊ नये, याची काळजी जात पडताळणी समितीने घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बेलदार व गवंडी समाजाच्या शिष्टमंडळानी  आयोगाचे सदस्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्याकडे मांडल्या. 

00000

Sunday, August 24, 2025

वृत्त क्रमांक 898 

नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू - पालकमंत्री अतुल सावे

·         पुनर्वसित गावातील नागरिकांना लवकरच पक्की घरे

·         संवेदनशील पालकमंत्री यांच्यातर्फे पूरग्रस्तांना वैयक्तिक मदतीचे धनादेश वाटप

·         हसनाळ, रावणगाव, भासवाडी, मुक्रमाबाद गावांना भेट देवून केली पाहणी

·         नुकसानग्रस्तांना शासनाच्यावतीने लवकरच मदत मिळवून देणार 

नांदेड दि. 24 ऑगस्ट :- मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी, मुक्रमाबाद या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होवून मोठया प्रमाणात हानी झाली. अनेक घरांची पडझड झाली तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. या सर्व नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. 

पालकमंत्री यांनी आज मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावणगाव, भासवाडी, मुक्रमाबाद या पूरग्रस्त गावांना भेट देवून पूराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, मुखेडचे तहसिलदार राजेश जाधव आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

पूरग्रस्तांच्या सर्व समस्या तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात येवून त्या सर्व समस्या सोडविण्यात येतील. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यात येईल अशी माहिती  पालकमंत्री श्री. सावे यांनी दिली. यावेळी हसनाळ येथे पालकमंत्री यांनी वैयक्तिकरित्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत धनादेशाद्वारे देण्यात आली. 

तसेच नुकसान झालेल्या पुनर्वसित गावातील नागरिकांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येवून या नागरिकांना पक्की घरे देण्याचा येतील. शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले. 

पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाचविण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कौतुकास्पद काम केले असून मी त्यांच्या सतत संपर्कात राहून माहिती घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नुकसानग्रस्त भागात पाणी शिरुन जी हानी झाली यास जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पालकमंत्री श्री. सावे यांच्याकडून वैयक्तिकरित्या

मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत

संवेदनशील पालकमंत्री अतुल सावे यांनी वैयक्तिकरित्या मयत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते हसनाळ येथे करण्यात आले. तसेच ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते अशा नागरिकांना 10 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. 

मागील तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य उपलब्ध करून दिले होते. हे साहित्य देगलूरचे उपविभागीय अधिकारी व मुखेडचे तहसीलदार यांच्यामार्फत पूरग्रस्तगावांमध्ये वितरण करण्यात आले. या साहित्यात प्रामुख्याने दैनंदिन वापरातील कपडे साडी, टीशर्ट, ट्रॅकपँट, टॉवेल, आणि जीवनावश्यक औषधे पॅरासीटामॉल टॅबलेट स्ट्रिप, ओआरएस इ. साहित्याचा यामध्ये समावेश होता. 

पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतला जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा

आज सकाळी पालकमंत्री अतुल सावे यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा सविस्तर घेतला. यावेळी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख आदीची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा माहिती दिली.

Saturday, August 23, 2025

 वृत्त क्रमांक 897

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 23 ऑगस्ट :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 24 ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 9 वा. छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने बैठक. स्थळ: शासकीय विश्रामगृह, नांदेड. सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून हसनाळ ता. मुखेड जि. नांदेडकडे वाहनाने प्रयाण. दुपारी 12 वा. हसनाळ ता. मुखेड येथे आगमन व अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी. दुपारी 12.45 वा. हसनाळ येथून रावणगाव ता. मुखेडकडे वाहनाने प्रयाण. दुपारी 1.15 वा. रावणगाव ता. मुखेड जि. नांदेड येथे आगमन व अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी. दुपारी 1.45 वा. रावणगाव येथून मुक्रमाबादकडे वाहनाने प्रयाण. दुपारी 2 वा. मुक्रमाबाद ता. मुखेड जि. नांदेड येथे आगमन व अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी. सोईनुसार मुक्रमाबाद ता. मुखेड येथून शासकीय विश्रामगृह, नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सोईनुसार शासकीय विश्रामगृह नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.
00000

 वृत्त क्रमांक 896

जिल्हाधिकाऱ्यांनी किनवट तालुक्यातील गावांमध्ये भेट देवून पीक नुकसानीची केली पाहणी
नांदेड दि. 23 ऑगस्ट:- मागील आठवडयात नांदेड जिल्ह्यात सतत पाऊस व अतिवृष्टी होवून अनेक हेक्टर शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे व पैनगंगा नदीच्या पुरामुळे किनवट तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज किनवट तालुक्यातील भंडारवाडी, पिंप्री या गावांना भेट देवून पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, नायब तहसिलदार फोले, कृषी विभागाचे अधिकारी, परिसरातील शेतकरी आदींची उपस्थिती होती.

किनवट तालुक्यात पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या गावात पूरपरिस्थिती निर्माण होवून कापूस, सोयाबिन व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरु असून ते तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. तसेच यावेळी त्यांनी किती टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे यांचा आढावा घेतला. तसेच सहस्त्रकुंड धबधबा येथे पाहणी करुन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
00000

वृत्त क्रमांक प्रगती महिला बचत गटातील 130 महिलांना शास्त्रीय पशुपालन व चारा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण • किनवट येथे दोन दिवसीय प्रशिक्षण • ...