Tuesday, August 5, 2025
वृत्त क्रमांक 811
क्रीडांगण व व्यायामशाळा विकासासाठी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
६ ते १४ ऑगस्टपर्यंत अर्ज वाटप व प्रस्ताव स्वीकारणार
नांदेड, दि. ५ ऑगस्ट :–राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व प्रचार-प्रसार यासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने सन २०१२ पासून राज्य क्रीडा धोरण राबवले जात आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता क्रीडांगण विकास व व्यायामशाळा विकास योजना अंतर्गत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
क्रीडांगण विकास योजनेत एकूण १३ बाबींचा समावेश असून, विविध सुविधा उभारणीसाठी संस्थांना व्यायामशाळा विकास योजनेत व्यायामशाळेचे बांधकाम, अद्ययावत साहित्य खरेदी किंवा खुली जिम उभारणी यासाठी साहित्य/अनुदान देण्यात येणार आहे.
सदर योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज ६ ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत (सुटीचे दिवस वगळून) जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथील क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध होतील व तेथेच स्वीकारले जातील.
अर्ज मागविण्याच्या वेळी संस्थेचे दोन्ही नोंदणी प्रमाणपत्रांची सत्यप्रती किंवा संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज मागणी पत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच अर्ज वितरित करण्यात येतील, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
०००००
वृत्त क्रमांक 810
विविध ८६ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेचे यशस्वी आयोजन
१७ हजारांहून अधिक अर्ज, ११ हजारांहून अधिक उमेदवारांची परीक्षा
नांदेड, दि.५ ऑगस्ट :–डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड येथे वर्ग-४ मधील विविध ८६ रिक्त पदांच्या भरतीसाठी २५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली.
या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून १७,१४६ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते, त्यापैकी ११,८६८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षेत सहभाग घेतला. परीक्षेसाठी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नांदेड या प्रमुख शहरांतील एकूण ११ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
परीक्षेचे आयोजन अत्यंत पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर जामर यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे व निरीक्षक नेमण्यात आले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता परीक्षा शांततेत पार पडली.
या भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्यांबाबत व परीक्षेचा निकाल महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. बी. देशमुख यांनी दिली.
०००००
वृत्त क्रमांक 809
आधुनिक तंत्रज्ञानाचे न्यू एज कोर्सेस आता देगलूरमध्ये उपलब्ध
सोलार टेक्निशियन कोर्ससाठी प्रवेश सुरू; दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी
नांदेड, दि. ५ ऑगस्ट:– कौशल्य, रोजगार, नाविन्यता व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या न्यू एज कोर्सेस योजनेंतर्गत देगलूर येथील अक्का महादेवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सोलार टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या नवीन अभ्यासक्रमाची सुरूवात झाली आहे.
या कोर्ससाठी एकूण दोन युनिट असून एकूण ४० जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर कोर्स आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्णसंधी देतो.
विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी वेळेत नोंदणी करून प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य, अक्का महादेवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देगलूर, जि. नांदेड यांनी केले आहे.
००००
Monday, August 4, 2025
वृत्त क्रमांक 808
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी 18 बालके मुंबईकडे रवाना
नांदेड दि. 4 ऑगस्ट : श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 डी इको तपासणी शिबिर 16 जुलै रोजी घेण्यात आले होते. या शिबिरामधून 18 हृदय शस्त्रक्रियेसाठी पात्र झालेल्या बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुंबई येथे आज रवाना करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्त्वाखाली या बालकांना तपासणी करण्यात आली होती. सदरील कार्यक्रमांतर्गत मागील वर्षीपासून 125 बालकांच्या ह्र्दय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आलेल्या असून इतर आजाराच्या 634 शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. एकूण 76 बालकांना श्रावण यंत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आल्याने त्यांचा बहिरेपणा दूर झाला आहे. यामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शाळा, अंगणवाडी मधील बालकांची आरोग्य तपासणी होऊन त्यांना असलेल्या आजारापासून मुक्त करण्यासाठी वेळीच औषधोपचार आणि गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने पालक व शिक्षक यांच्याद्वारे समाधान व्यक्त होत आहे.
याकामी अनिल कांबळे आरबीएसके जिल्हा कार्यक्रम समन्वयक, विठ्ठल तावडे डीइआयसी व्यवस्थापक श्रीमती अनिता चव्हाण आणि गुनानंद सावंत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व डीइआयसी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
00000
वृत्त क्रमांक 807
एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे
जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण, पोषणाबाबत घेतला आढावा
नांदेड दि. 4 ऑगस्ट : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांची अंमलबजावणी करताना कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनच्या कॅबिनेट सभागृहामध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची अंमलबजावनी, आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली, नियतन, उचल, वाटप, अन्न वितरणप्रणालीबाबतच्या तक्रारी, पोषण, पोषण आहार याअनुषंगाने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, लेखाधिकारी निळकंठ पांचगे, डॉ. सान्वी जेठवाणी, तालुक्याचे पुरवठा निरीक्षण, एकात्मिक महिला व विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, मनपा, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर आदींची उपस्थिती होती.
नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील अंगणवाड्या, पुरवठा विभागाचे कार्यालये याठिकाणी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांच्या नावाचे बोर्ड तात्काळ दर्शनी भागात लावावेत अशा सूचना अध्यक्ष महेश ढवळे त्यांनी दिल्या. शासनाच्या कल्याणकारी योजना गरजू लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करा. मय्यत, स्थलांतर, लग्न होवून बाहेर गावी गेलेल्या महिला यांची यादी तात्काळ तयार करुन ताळमेळ काढा. जोपर्यत सर्वेक्षण होणार नाही तोपर्यत याद्या अद्ययावत होणार नाहीत याची काळजी तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांनी घ्यावी. त्यांच्या नियंत्रणाखाली रेशन दुकानांचे नियंत्रण करा. मागेल त्याला रेशन आणि रेशनकार्ड द्या अशा सूचना आयोगाचे अध्यक्ष श्री. ढवळे यांनी दिल्या. यासोबत त्यांनी शहरी भागात वर्दळीच्या ठिकाणी भिक्षुक महिला व मुलांचा सर्वे करुन त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, म्हणजे खऱ्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचल्याचा आनंद होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड यांनी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांची तालुकानिहाय संख्या, शिधापत्रिकांची संख्या, मोफत अन्नधान्याचे वाटप, आधार सींडीगची माहिती, नियतन, उचल वाटप, इष्ठांक, जिल्ह्यातील एकूण गोदामे व क्षमता, नव्याने वितरीत केलेल्या शिधापत्रिका याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
शालेय पोषण आहार : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना
नांदेड जिल्ह्यातील शाळेत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सहाय्याने शाळेतील मुलांना पोषण आहार शिजवून देण्यात येतो. या अंगणवाडीतील मुलांना पोटभर जेवण मिळते का, शाळेत ज्या तांदुळाची खिचड शिजविण्यात येते त्यांची चव, दर्जा तपासा, डब्बामुक्त जिल्हा करण्यासाठी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा. यासाठी वारंवार शाळांना भेटी द्या, शाळांना वितरण केलेल्या खाद्य मालाची तपासणी करण्याबाबत मुख्याध्यापकांना सूचना द्या अशा महत्वाच्या सूचना आयोगाचे अध्यक्ष श्री. ढवळे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी व त्यांना वितरीत करण्यात आलेल्या आहाराबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच अंगणवाडी व सुपरवायझर यांनी गरजू व पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ मिळवून देण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच कमी वजनाची बालके, गरोदर माता, जन्मापूर्वी कमी वजन असलेली बालके यांचा शोध घेवून त्यांच्यावर तात्काळ उपाययोजना करा निर्देश श्री. ढवळे यांनी दिले. जिल्ह्यातील तांडा, वस्त्या, आदिवासी पट्टे या भागातील लहान मुलांना पोषण होईल यादृष्टीने सर्वानी काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तृतीयपंथीय यांना रेशन कार्ड व राशन मिळण्यासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. तसेच तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करणार असून त्यांचे प्रश्न शासनस्तरावर मांडणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
00000
वृत्त क्रमांक 806
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे
नांदेड विमानतळावर आगमन व
हिंगोलीकडे प्रस्थान
नांदेड, 4 ऑगस्ट :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांचे आज नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन
केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी
कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार
आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप
महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ.
महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
हिंगोली येथील भव्य कावड यात्रा
नियोजित कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावरून
हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण केले.
00000
केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

