वृत्त क्रमांक
कापूस श्रेडर घटकासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर
अर्ज करावेत
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 हजार, तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 60 हजार रुपयांपर्यंत अनुदान
नांदेड, दि. 23 : कापूस उत्पादकता
अभियानांतर्गत (कपास क्रांती) सन २०२६-२७ मध्ये कापूस श्रेडर या घटकासाठी पात्र
शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक
कंपन्या व संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
कापूस उत्पादकता अभियान राज्यातील
अहिल्यानगर, धुळे, जळगाव,
नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती,
यवतमाळ, वाशिम, बुलढाणा,
अकोला, वर्धा, नागपूर,
चंद्रपूर आणि गडचिरोली या १९ जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. या
योजनेंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबींमध्ये कापूस श्रेडर हा घटक समाविष्ट
करण्यात आला आहे. यासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट,
शेतकरी उत्पादक कंपनी अथवा संस्था तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत
सहकारी संस्था लाभ घेण्यास पात्र आहेत.
कापूस श्रेडर खरेदीसाठी अनुसूचित जाती व
अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना यंत्राच्या किमतीच्या 50 टक्के, कमाल 75 हजार रुपये,
तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना किमतीच्या 40 टक्के, कमाल 60 हजार रुपये
अनुदान देय आहे. लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS)
या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
पात्र शेतकरी व संबंधित संस्थांनी कापूस
श्रेडर घटकासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin
या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. योजनेची अधिक
माहिती मिळविण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी
अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा पात्र शेतकरी व संस्थांनी जास्तीत
जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाच्या वतीने
करण्यात आले आहे.
*******

No comments:
Post a Comment