वृत्त क्रमांक
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा सुधारित नांदेड जिल्हा दौरा
नांदेड, दि. 31 (जिमाका) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे दि. 1 व 2 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सुधारित दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजता मंत्री प्रकाश आबिटकर यांचे नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आगमन व मुक्काम होईल. सकाळी 7.30 वाजता ते मोटारीने उपजिल्हा रुग्णालय, हिमायतनगर येथे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता रुग्णालयाची पाहणी व रुग्णकल्याण समितीची बैठक होईल. सकाळी 9.30 वाजता हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी व दरेगाव तांडा येथील दुष्काळग्रस्त क्षेत्राची पाहणी करून ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
सकाळी 10 वाजता ते हिमायतनगर येथून हदगाव येथील खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. 10.40 वाजता खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या निवासस्थानी आगमन करुन सदिच्छा भेट व आरोग्यविषयक विविध विषयावर चर्चा करतील. सकाळी 11 वाजता हदगाव येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन व जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी आशियाई विकास बँक प्रगती प्रकल्पांतर्गत नांदेड शहरात नव्याने मंजूर 500 खाटांच्या रुग्णालयाच्या बाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 12 ते 1 पर्यंत राखीव.
दुपारी 1 ते 5 या वेळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाडी बुद्रुक (पावडेवाडी) येथे आयोजित ग्रामीण रुग्णालय व इतर विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यास ते उपस्थित राहतील. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत लोहा तालुक्यातील आरोग्य संस्थांना भेटी देतील. त्यानंतर नांदेड शहरातील विविध आरोग्य संस्था तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयांची पाहणी करून लाभार्थ्यांशी संवाद साधतील. रात्री 8.30 वाजता नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
सोमवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून जिल्हा महिला व बाल रुग्णालयाकडे प्रयाण. 8.05 वाजता जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे आगमन व पाहणी. 8.30 वाजता जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य संवाद साधतील.
9.30 वाजता मंत्री प्रकाश आबिटकर हे नांदेड येथून हिंगोली जिल्ह्यातील वसमतकडे प्रयाण करतील.
***
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर
• रुग्णालयांची पाहणी, आरोग्य समित्यांची बैठक व दुष्काळग्रस्त भागाचा घेणार आढावा
नांदेड, दि. 31 (जिमाका) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे दि. 1 व 2 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध आरोग्य संस्थांची पाहणी, रुग्णकल्याण समित्यांच्या बैठका, दुष्काळग्रस्त भागाची पाहणी तसेच शेतकरी व आरोग्य विभागातील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
रविवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजता मंत्री प्रकाश आबिटकर यांचे नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आगमन व मुक्काम होईल. सकाळी 7.30 वाजता ते मोटारीने उपजिल्हा रुग्णालय, हिमायतनगर येथे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता रुग्णालयाची पाहणी व रुग्णकल्याण समितीची बैठक होईल. सकाळी 9.30 वाजता हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी व दरेगाव तांडा येथील दुष्काळग्रस्त क्षेत्राची पाहणी करून ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
सकाळी 10 वाजता ते नांदेड येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वाजता रुग्णालयात आगमनानंतर पाहणी, आढावा व रुग्णकल्याण समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य संवाद साधतील.
दुपारी 1 ते 5 या वेळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाडी बुद्रुक (पावडेवाडी) येथे आयोजित ग्रामीण रुग्णालय व इतर विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यास ते उपस्थित राहतील. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत लोहा तालुक्यातील आरोग्य संस्थांना भेटी देतील. त्यानंतर नांदेड शहरातील विविध आरोग्य संस्था तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयांची पाहणी करून लाभार्थ्यांशी संवाद साधतील. रात्री 8.30 वाजता नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
सोमवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता मंत्री प्रकाश आबिटकर हे नांदेड येथून हिंगोली जिल्ह्यातील वसमतकडे प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment