वृत्त क्रमांक
ओबीसी महामंडळाच्या थकीत व्याजात 50 टक्के सवलत
एकरकमी कर्ज परतफेड योजनेची मुदत 31 मार्च 2027 पर्यंत
नांदेड (जिमाका), दि. 16: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि
विकास महामंडळामार्फत कर्ज घेतलेल्या थकबाकीदार लाभार्थ्यांसाठी सुधारित एकरकमी
परतफेड योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण थकीत कर्जाची रक्कम
एकरकमी भरल्यास थकीत व्याजात 50 टक्के सवलत मिळणार आहे. ही
योजना 31 मार्च 2027 पर्यंत लागू
राहणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन
कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक
एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर
मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जिल्हा
कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ज्ञानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, हिंगोली रोड, नांदेड -431605
येथे किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 2200865 वर संपर्क साधावा.
******
No comments:
Post a Comment