Wednesday, July 22, 2026

वृत्त क्रमांक 

27 जुलै रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात

27 व्या कारगिल विजय दिवसाचे आयोजन 

नांदेड दि. 22 जुलै :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात २७ वा कारगिल विजय दिवस दिनांक २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक, शहीद जवानांचे नातेवाईक व समाजातील देशभक्त यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

शहीद सैनिकाच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे २७ वा कारगिल विजय दिवस साजरा करण्याचे ठरले आहे. समाजातील नागरिकांमध्ये तसेच १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवकांमध्ये कर्तव्य भावना व सैनिकांबद्दल अभिमान दीर्घकाळ जिवंत राहावा व आपल्या कर्तव्याची जाणीव समाजातील जनतेत सतत निर्माण व्हावी व देशभक्तीची ज्वलंत उर्जा कायम राहावी म्हणून संपूर्ण देशात दरवर्षी २६ जुलैला कारगिल विजय दिवस कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून साजरा करण्यात येतो.

00000

No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकरी बांधवानो, आपले सरकार सेवा केंद्रावरील आधार प्रमाणीकरणाची कार्यपद्धती जाणून घ्य...