Friday, January 23, 2026

 वृत्त क्रमांक 102 

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमासाठी विविध २० ठिकाणांहून मोफत बससेवा 


भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन 


नांदेड, दि. २३ जानेवारी : “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर दिनांक २४ व २५ जानेवारी, २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाविक व नागरिकांना सहजपणे उपस्थित राहता यावे, यासाठी शहर व परिसरातील एकूण २० ठिकाणांहून मोदी मैदानापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


ही बससेवा रेल्वे स्टेशन, बसस्थानक, पासदगाव-तरोडा नाका, सांगवी-चैतन्यनगर, शंकरराव चव्हाण चौक-साठेचौक, सिडको-लातूर फाटा, धनेगाव-वाजेगाव, राजकॉर्नर-शिवाजीनगर, सराफा चौक-जुना कौठा मोंढा, ढवळे कॉर्नर-सिडको, लिंबगाव-छत्रपती चौक-मोर चौक, नाळेश्वर, आसना-राजकॉर्नर, विष्णुपुरी, कामठा-नमस्कारचौक, हडको, निळा-जयभवानी चौक, सोनखेड-वाडीपाटी-विष्णुपुरी, उस्माननगर-वडगाव-सिडको तसेच मारतळा-जवाहरनगर-तुप्पा-चंदासिंग कॉर्नर येथून मोदी मैदान येथील कार्यक्रम स्थळापर्यंत देण्यात आली आहे. 


या मोफत बससेवेचा लाभ घेवून सर्व भाविक व नागरिकांनी “हिंद दी चादर” शहीदी समागम कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000






No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...