नांदेड :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड जिल्हाधिकार्यांकडून नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
- नांदेड जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 23, तर 28 सप्टेंबर रोजी 13 मंडळात अतिवृष्टी झाली. गोदावरी, मांजरा, मन्याड नद्यांच्या लाभक्षेत्रात पूरस्थिती निर्माण झाली. 67 लोकांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे.
- नांदेडमध्ये 304 आणि लोहामध्ये 120 लोकांना मदत शिबिरात ठेवण्यात आले असून, त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. एकूण 16 मदत शिबिरे तयार करण्यात आली आहेत. 56 घरांची पडझड झाली असून, त्यांना तातडीने मदत देण्याची कार्यवाही सुरु आहे.
#Maharashtra #Marathwada #Nanded
https://x.com/cmomaharashtra/status/1972234529793520113?s=46&t=S0m9fgIBggcpst3bZGqn1g
No comments:
Post a Comment