वृत्त
क्र. 1243
देशी गायींचे पालन पोषण अनुदानासाठी
ऑनलाईन अर्ज करण्यास 5 जानेवारीपर्यत मुदतवाढ
नांदेड दि. 30 डिसेंबर : राज्यातील गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांमधील देशी गायीच्या पालनपोषणासाठी प्रति दिन प्रति पशु 50 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानासाठी 5 जानेवारी 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी पात्र गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थानी www.mahagosevaayog.org व https://schemes.mahagoseeraayog.org या संकेतस्थळावर 5 जानेवारी 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबतची सविस्तर माहिती www.mahagosevaayog.org व https://schemes.mahagoseeraayog.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सुधारित नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. या योजनेचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यासाठी 16 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 कालावधी दिला आहे. गोसेवा आयोगामार्फत प्राप्त अर्जाची प्राथमिक तपासणी 6 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. जिल्हा गोशाळा पडताळणी समितीद्वारा प्राथमिक तपासणी अंती पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी 11 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. जिल्हा गोशाळा पडताळणी समिती अहवालानुसार अनुदानास पात्र गोधनाची संख्या आयोग कार्यालयास 21 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत कळविण्यात येणार आहे.
00000
No comments:
Post a Comment