Friday, December 27, 2024

वृत्त क्र. 1234

स्मार्ट प्रकल्पातर्गंत खरेदीदार विक्रेता संमेलन संपन्न

खरेदी विक्रीबाबत 12 सामंजस्य करार

                                                                                                                                                                       नांदेड, दि. 27 डिसेंबर :- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्यावतीने खरेदीदार विक्रेते संमेलनाचे आयोजन करण्यात नुकतेच करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन हॉटेल सिटी सिम्फनी येथे पार पाडले. 

संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकूमार कळसाईत हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. शिवाजीराव शिंदे, केळी संशोधन केंद्राचे निलेश देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्याजी शिंदे, दत्तगुरु फार्मर प्रो.कं.कळमनूरीचे संचालक प्रल्हाद रामजी इंगोले, शेतकरी मित्र फार्मर प्रो.कं.लिचे संचालक बद्रिनारायण मंत्री, हळद व भूसार खरेदीदार गुट्टू शेठ मुरक्या, संचालक हळद खरेदीदार वसमत, लातूरचे एडीएम राम सिनगारे, एमएआयडीसीचे विभागीय व्यवस्थापक प्रल्हाद फड यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी खरेदीविक्रीबाबत शेतमालाचा दर्जा, मागणी-पुरवठा, शेतीचे अर्थशास्त्र, सोयाबीन, हळद, हरभरा इ. पिकांचे उत्पादन व विक्री बाबतीत खरेदीदार व विक्रेता यांच्यामध्ये चर्चा व करार करण्यात आला आहे.

या संमेलनाची प्रस्तावना व उद्देश आत्माचे प्रकल्प संचालक आत्मा अनिल शिरफुले यांनी केली. तसेच स्मार्ट प्रकल्पाचे सादरीकरण लातूरचे विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर यांनी केले. जिल्हयातील शेतमाल पिके खरेदी-विक्री व्यवसायास असणारा वाव याबाबत माहिती तसेच सहभागी समुदाय आधारीत संस्थांचा परिचय सादरीकरणासह नोडल अधिकारी अनिल शिरफुले यांनी केला. खरेदीदारांचा सादरीकरणासह परिचय लातूरचे विभागीय पुरवठासाखळी व मूल्यसाखळी तज्ञ  जगदीशकुमार कांबळे यांनी उपस्थितांना करून दिला. 

खरेदीदार व विक्रेते यांच्यात चर्चा घडवून आणून त्यांना एकाच मंचावर आमंत्रित करून हळद, सोयाबीन, हरभरा, तूर या पिकांच्या खरेदी विक्रीबाबत 12 सामंजस्य करार करण्यात आले. या संमेलनास जिल्हयातील कृषि, माविम, एमएसआरएल, पशूसंवर्धन  प्रकल्प यंत्रणाअंतर्गत 21 समुदाय आधारीत संस्थांच्या संचालकांची उपस्थिती होती. तसेच स्मार्ट प्रकल्पाचे सतिश महानवर, विभागीय एमआयएस सनियंत्रण व मूल्यमापण अधिकारी, रोहित कांबळे, लातूर विभागीय सामाजिक विकास तज्ञ यांच्यासह जिल्हा पशूसंवर्धन कार्यालयातील अधिकारी डॉ.आनंद गायकवाड यांचीही उपस्थिती संमेलनात होती.

संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तसेच खरेदीदार व विक्रेते यांच्यामध्ये करार घडवून आणण्यासाठी प्रकल्प संचालक अनिल शिरफुले तसेच अर्थशास्त्रज्ञ व डीआययूचे वित्त सल्लागार राहूल लोहाळे, लेखापाल मुजीब उल रहेमान, सौ.दिपा भालके, संगणक चालक यांनी परिश्रम घेतले. संमेलनाचे सूत्रसंचलन, आभार प्रदर्शन व समारोप डॉ.जी.एस. देशमाने, एमआयएस अधिकारी यांनी केले.

00000



No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...