Friday, October 4, 2024

  वृत्त क्र. 899

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड दि. 4 ऑक्टोबर :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक नांदेड तालुक्यात पीक कापणी प्रयोगांना वेग; 25 टक्के प्रयोग पूर्ण • 15 ऑक्टोबरपर्यंत प्रयोग पूर्ण करण्याचे नियोजन • शेतकऱ्य...