Wednesday, June 22, 2022

 भारतीय स्टेट बँक आरसेटी येथे जागतिक योगा दिवस संपन्न 

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) तथागतनगर नांदेड येथे 21 जून  रोजी जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला.

 

आरसेटीमध्ये आयोजित महिला टेलर प्रशिक्षणाच्या 30 प्रशिक्षणार्थी आणि वुशु संघटना नांदेडचे मुख्य प्रशिक्षक प्रमोद वाघमारे, कौशल्य समन्वयक पंचायत समिती चे अतिष गायकवाड, संचालक आरसेटी राम भलावी, विश्वास हट्टेकर, सहाय्यक रुणीत अभिजित पाथरीकर, सहाय्यक आरसेटी अर्धापुरकर यांची उपस्थिती होती.

 

योगा हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये उत्तम आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्यासाठी जन जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. योगाचे महत्व आणि जास्तीत जास्त लोकांनी योगाभ्यास कडे वळावे या उद्देशाने अनेक प्रोत्साहनपर संदेश या रॅली मध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात आले. मान्यवरांनी मानवी जीवनामध्ये योगाचे महत्व विशद करून योगामध्ये समाविष्ट कृतींचे विश्लेषण करून त्याचे फायदे प्रशिक्षणार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरसेटी कर्मचारी मारोती कांबळे यांनी परिश्रम घेतले.

0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...