मुदखेड येथे नऊ तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
नांदेड, दि. 25 :- जिल्हास्तरीय
तंबाखू नियंत्रण पथकाकडून नुकतेच मुदखेड येथे अचानक धाडी टाकण्यात आल्या. कोटपा कायद्यातील
तरतुदीनुसार या पथकामार्फत 9 तंबाखू विक्रेत्यांकडून 4 हजार 800 रुपये इतका दंड
आकारण्यात आला.
राष्ट्रीय तंबाखू
नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ
भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. नांदेड जिल्ह्याअंतर्गत
कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय
कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा
तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा
तंबाखूमुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक
यांनी केले आहे.
या परिसरात तंबाखू व
तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे तसेच कोटपा 2003 कायद्याचे
उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना तिवारी, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड व
स्थानिक पोलीस उप निरीक्षक मुंढे, पोहेकॉ राठोड आदी होते.
00000
No comments:
Post a Comment