Tuesday, January 2, 2018

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे
5 जानेवारीला आयोजन
नांदेड, दि. 2 :- "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने शुक्रवार 5 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नांदेड याठिकाणी एक दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ‍शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
            जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शिबिरात पुणे येथील प्रा. अभिजित राठोड हे राज्यसेवा पूर्व परीक्षा रणनिती : अर्थशास्त्र व राज्यव्यवस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संबंधीतांनी मार्गदर्शन ‍शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...