Monday, September 26, 2016

विधानसभा विरोधी पक्षनेता
राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
नांदेड, दि. 26 :-  राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 रोजी औरंगाबाद विमानतळ येथून खाजगी विमानाने नांदेड विमानतळ येथे सकाळी 11 वा. आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. स्व. प्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 12.30 वा. वर्कशॉप कॉर्नर येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने माहूर जि. नांदेडकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार 1 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 1 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...