Thursday, May 21, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात #पेट्रोल , #डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

#नांदेड दि. 21 मे :- नांदेड शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबतच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीती व गोंधळ निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र नांदेड शहर तसेच जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा आणि नियमितपणे पुरवठा होत आहे. अचानकपणे डिझेलच्या मागणीत 25-30 टक्के वाढ झाल्याने, पॅनीक खरेदी होत असल्याने टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, असा स्पष्ट खुलासा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी केला आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, #इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत सुरू असून संबंधित यंत्रणेमार्फत यावर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. गुरूवार 21 मे 2026 रोजीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण 1 हजार 951 केएल (KL) पेट्रोल आणि 2 हजार 79 केएल (KL) डिझेलचा साठा उपलब्ध आहे.
नागरिकांना आवाहन व #सूचना
* कोणत्याही अप्रमाणित अफवा, सोशल मीडियावरील चुकीचे संदेश किंवा माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
* भीतीपोटी किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात पेट्रोल / डिझेल खरेदी करून साठवणूक करण्याचा प्रयत्न करू नये.
* पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, ज्यामुळे वाहतूक कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
* अफवा पसरविणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय अपराध असून, अशा कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
* नागरिकांना कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी.
#तक्रारनिवारण संपर्क व्यवस्था
जिल्ह्यातील नागरिकांना पेट्रोल / डिझेलबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा
* व्हॉट्सअॅप चॅट बॉट सेवा ( WhatsApp Chat Bot) : 8668223326
* ई-मेल आयडी : dsonanded1@gmail.com
तालुकास्तरावरील #संपर्कक्रमांक
नांदेड- 7030773040, अर्धापूर- 8805068954, मुखेड- 9356806405, धर्माबाद- 9421841447, मुदखेड- 9445112782, उमरी- 8805447837, बिलोली- 9637963222, लोहा- 9356806405, हिमायतनगर- 8308073089, हदगाव- 8805068954, कंधार- 9823757345, माहूर - 9403184473, किनवट- 9850296096, भोकर- 8421183602, देगलूर- 9423805064, नायगाव- 7057002865 याप्रमाणे आहेत.
नागरिकांनी शांतता, संयम व सहकार्य राखावे. सर्वांच्या सहकार्याने कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन समस्येविषयी आढावा बैठकीत त्यांनी नागरिकांना आवाहन केले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक, तेल कंपनीचे विक्री अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते.
00000




Wednesday, May 20, 2026

 #घनकचरा व्यवस्थापन





 

वैविध्यपूर्ण #नांदेड


 

गुरूद्वारांचे पवित्र शहर नांदेड #गुरूद्वारा


 



 

 वृत्त क्रमांक 

घनकचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक-फौजदारी कारवाई 

कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना 

नांदेड दि. 20 मे :- जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी BWG Entity यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करून आपला परिसर स्वच्छ ठेवावा. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे.  

भारत सरकार पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 निश्चित करून दिले असून, त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून सुरु झाली आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 मे 2026 रोजीच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात 14 मे 2026 रोजी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 नुसार प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या घरातील घनकचरा हा ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा व विशेष देखभाल/घरगुती घातक कचरा या 4 पद्धतीने वर्गीकृत करून घंटागाडीत देणे बंधनकारक आहे. नागरिकांनी उघड्यावरील कचरा जाळू नये. सार्वजनिक ठिकाणी, नालीमध्ये कचरा फेकू नये, सॅनिटरी पॅड, डायपर व्यवस्थितपणे गुंडाळून घंटागाडी स्वच्छता कर्मचाऱ्यास देणे, कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय, घातक कचरा घरगुती कचऱ्यात मिसळू नये. रस्त्यावरील विक्रेत्यांनी, व्यापाऱ्यांनी त्यांचेकडील शिल्लक, उष्टे अन्न, डिस्पोजेबल प्लेट, ग्लास, कप, कॅन, नारळाचे कवच, पॅकेजिंग, पाउच इत्यादी कचरा थेट रस्त्यावर न फेकता वर्गीकरणानुसार साठविण्यासाठी वेगवेगळे डब्बे, कंटेनर ठेवावीत.

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 मधील नियम 6 अन्वये Bulk Waste Generator म्हणजे रहिवासी सोसायटी, अपार्टमेंट, गृहनिर्माण संस्था, सरकारी कार्यालय, विभाग,  शैक्षणिक संस्था, रेल्वे-बस स्टेशन, मॉल्स, हॉटेल, हॉस्पीटल, मार्केट, मंगल कार्यालये, स्टेडियम ई. ज्यांचे क्षेत्र 20 हजार स्क्वेअर मीटर आहे, जे दररोज 40 हजार लिटर पाणी वापरतात, जे दररोज 100 किलो किंवा त्यापेक्षा जास्त कचरा निर्माण करतात अशा सर्व BWG यांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचऱ्यावर जागेवर प्रक्रिया करावी व  सॅनिटरी, सुका कचरा नगरपरिषद, मनपा किंवा अधिकृत एजन्सीकडे सुपूर्द करावा. जे BWG संस्था निर्देशांचे पालन किंवा नियमाकडे दुर्लक्ष करतील त्यांचे पाणी, वीज पुरवठा थांबविण्यासंबंधी जिल्हाधिकारी यांना अधिकार आहेत. याबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी, असेही कळविले आहे. 

ओला कचरा : 

यात खाद्य पदार्थांचे अवशेष (भाताचे पाणी, तेल, मसाले), भाजीपाला, फूलांचे पंखुरी आणि माळा, गवत, बागेचा कचरा (झाडांची कतरणी), कागदाचे अवशेष, दूध आणि दही पात्रे, पशु खाद्य अवशेष इ. समावेश आहे.  

सुका कचरा :  

प्लास्टिक (बॉटल, पाउच, बॅग), कागद (वर्तमानपत्र, पत्रिका, पुस्तके), धातू  (अॅल्युमिनियम, स्टील, तांबे), काच (बॉटल, पात्रे, खिडकी), लाकडी वस्तू, (फर्निचर, बक्से), रबर (टायर, जूते), जुने कपडे, (जुनी साडी, कमीज) इ. 

सॅनिटरी कचरा :

सॅनिटरी पॅड, डायपर, फेस मास्क, वाईप्स, हँडग्लोज, सॅनिटरी औषधे (बॉटल, ट्यूब, पाउच), संक्रामक पदार्थ, औषधांचे अवशेष इ. 

विशेष देखभाल-घरगुती घातक कचरा : 

बॅटरी (सेल, रिचार्जेबल), ट्यूब लाइट, बल्ब (पारायुक्त), कीटनाशक, खाद अवशेष, ई-कचरा, (जुने फोन, कंप्यूटर पार्टस, ई.), रासायनिक पदार्थ (पेंट, विषारी द्रव) या वस्तुंचा यात समावेश आहे. 

00000

दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाखांचा निधी.! खरीप हंगामातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,...