Friday, July 10, 2026

वृत्त क्रमांक 

बुधवारी लोहा येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 10 जुलै :- नांदेड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व वीर माधवराव नळगे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 15 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून वीर माधवराव नळगे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर रोड, लोहा येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्हचे (जागेवर निवड संधी) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनांमध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 15 जुलै, 2026 रोजी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड,  बाबा नगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com आणि कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674  यावर संपर्क साधावा, असेही आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’मधील शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत ५० हजार रुपय...