वृत्त क्रमांक
नांदेडमध्ये आज मिनी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन
रेणुका महोत्सवामुळे महिलांना विक्रीसाठी खुले झाले दालन
नांदेड, दि.१२ मार्च:-मिनी सरस, रेणुका महोत्सव 2026 अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य विक्री व प्रदर्शन, १३ मार्च ते १८ मार्च २०२६ दरम्यान जिल्हा परिषद हायस्कूल, मल्टीपर्पज ग्राउंड, वजीराबाद नांदेड येथे भरवले जाणार आहे. वेळ सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेमध्ये उपलब्ध असणार आहे.
उमेद -
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान ,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद नांदेड
मिनी सरस,रेणुका महोत्सव दिनांक 13 मार्च ते 18 मार्च 2026 यादरम्यान हे विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे .
या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे ,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम,विधान परिषदेचे सदस्य तथा बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील,महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या हस्ते तर प्रमुख उपस्थिती खा. डॉ. अजित गोपछडे, खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे , आमदार विक्रम काळे, आमदार श्री सतीश चव्हाण, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार भीमराव रामजी केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर,आमदार राजेश पवार,आमदार जितेश आंतापूरकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार कुमारी श्रीजया चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान सचिव एकनाथ डवले , विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर छत्रपती संभाजी नगर, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सिडीबी बेलापूर नवी मुंबईचे निलेश सागर,विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे,श्रीमती मेघना कावली, जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक, डीआरडीए डॉ. संजय तुबाकले आदि मान्यवर व अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाची वेळ सकाळी नऊ ते रात्री दहा पर्यंत असणार आहे आणि हे प्रदर्शन मोफत प्रवेश व ग्राहकाला आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे सर्व कार्यक्रम विनामूल्य पाहता येणार आहे.
स्थळ -जिल्हा परिषद ची मल्टीपर्पज हायस्कूल जिल्हा परिषद शाळा, वजिराबाद ,महावीर चौक, नांदेड
या सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम
मध्ये यामध्ये आदिवासी नृत्य द्वारे स्वागत, ऐनोद्दीन वारसी यांचे बासरी वादन, अंधविद्यालय वसरणीचे पंकज शिरभाते यांचे गीतगायन, दिव्यांग विद्यालयातील विद्यार्थी यांचे समूह गायन, नाटिका, तृतीयपंथी यांचे लावणी, गणेश काकडे यांची लावणी व शुभम सर व नृत्यालय ग्रुप चे समूह डान्स, शिवराज्याभिषेक सोहळा सादरकर्ते - महात्मा फुले हायस्कूल बाबा नगरचे ५० विद्यार्थी- विद्यार्थींनीचा संच,
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचावर आधारित एक पात्री प्रयोग सादरकर्ते शाहीर दिगू तुमवाड, व त्यांचा संच,भीम गीते व महामानवावर गीते सादर करणारे
बाल कलावंत- आयुष सचिन डोम्पले, नागसेन विद्यालय सिडको व त्यांचा संच, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटिका सादर कर्ते सिने कलावंत मास्टर माधव पवार व त्यांचा संच, लोकधारा पारंपारिक, गवळी, लावणी, चुटकुले सादर कर्ते- शिवशंकर चिलगर व त्यांचा संच.
आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर इतर सामाजिक विषयावर ज्वलंत प्रश्न और परिसंवाद यांचे देखिल आयोजन करण्यात आलेले आहे असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले,जिल्हा अभियान व्यवस्थापक व्दारकादास राठोड यांनी आवाहन केलेले आहे.
oooo
No comments:
Post a Comment