वृत्त क्रमांक
मिशन लक्ष्यवेध जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रा अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित
नांदेड दि. 30 मार्च:- क्रीडा व युवक सेवा संचालनालयमार्फत राज्यातील विकासाकरीता “मिशन लक्ष्यवेध” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये विविध क्रीडा प्रकारांतील होतकरू व गुणवान खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळांडूना करीअर मार्गदर्शन खेळांडूच्या क्षमता विकासासाठी देशी, विदेशी संस्थाचा सहयोग हे सर्व घटक विकसित करणे अभिप्रेत आहे. उपरोत घटक विकसीत करण्याकरीता आवश्यक प्रयत्न हे फक्त राज्यस्तरावरून नव्हे तर जिल्हास्तरावरून देखील होणे अपेक्षित आहे. त्या करीता नांदेड जिल्हयास मिशन लक्ष्यवेध या योजने अंतर्गत जिल्हास्तरावर प्रतिभा विकास केंद्र नांदेंड करीता टेबल टेनिस, बॅडमिंटन, आर्चरी, हॉकी, ॲथलेटीक्स या पाच क्रीडाप्रकारांचे खेळांची केंद्र सुरू करावयाची आदेश प्राप्त झाले होते. परंतू 29.03.2026 रोजी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या ऑनलाइन बैठकीतील चर्चा नुसार आर्चरी, हॉकी व ॲथलेटीक्स या खेळांचे जिल्हा क्रीडा संकूल येथे या खेळाचे मैदान उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा प्रतिभा केंद्र अंतर्गत आर्चरी, हॉकी व ॲथलेटीक्स खेळ रदद करण्यात आलेले आहेत. याची नोंद घ्यावी.
सदर निवड प्रक्रियेदरम्यान खेळाडूंची शारीरिक क्षमता, तांत्रिक कौशल्य, मानसिक तयारी तसेच खेळातील कामगिरी यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. अनुभवी प्रशिक्षक व तज्ज्ञांच्या उपस्थितीत ही निवड चाचणी पार पडणार आहे. या उपक्रमाचा उद्देश गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना उच्चस्तरीय प्रशिक्षण देणे व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तयार करणे हा आहे.
खालील प्रमाणे निवड चाचणी ठिकाण व खेळप्रकार नमुद करण्यात आलेले आहेत.
1) टेबल टेनिस 2) बॅडमिंटन या खेळाची निवड चाचणी दि.02/04/2026 वेळ स.10.00 वा. जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड संपर्क क्रं. चंद्रप्रकाश होनवडजकर (रा.क्री.मा.) मो.7972953141, हानमंत नरवाडे मो.9604866253.
खेळाडू निवड चाचणीचे निकष व पात्रता- (1).वयोमर्यादा 21 वर्षाआतील मुले/मुली त्यावर्षाच्या 31 डिसेंबर रोजी) (2) जन्म दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्डे,गत 02 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज 03 फोटोग्राफ, शाळा महाविद्यालयीन बोनाफाईड प्रमाणपत्र, पालंकाचे संमतीपत्र इ. (3.) महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे. (4) क्रीडा कामगिरी- किमान राज्यस्तरावरील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू) (शालेय/संघटना अधिकृत स्पर्धा) गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुस्ती फिटनेस चाचण्यामध्ये पात्र होणे आवश्यक आहे. (5) शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैध वैद्यकिय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे.वरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. सदर निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी संबंधित आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी सुचविले आहे अधिक माहितीसाठी चंद्रप्रकाश होनवडजकर राज्य क्रीडा मार्गदर्शक- मो.7972953141 यांचेशी संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment