Wednesday, February 25, 2026

 वृत्त क्रमांक  

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 163 लागू   

नांदेड दि. 25 फेब्रुवारी :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 22 मार्च 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत पोलीस अधीक्षक, नांदेड कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

या आदेशात म्हटले आहे की,  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163  नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन वादग्रस्त जागा, चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 23 फेब्रुवारीच्या सकाळी 6 वाजेपासून ते 22 मार्च 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.  

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, तसेच जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिलेल्या व्यक्तीना व पोलीस अधीक्षक कार्यालयाने परवानगी दिलेल्या भाविकांना लागू राहणार नाही.

00000

No comments:

Post a Comment

#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! नवी मुंबईच्या खारघरमध्ये आयोजित या भव्य आध्यात्मिक सोहळ्याला आपली उपस्थि...